• Download App
    बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेसाठी प्रशासनाला साकडे ; साताऱ्यात वारकऱ्यांची धरपकड Bandatatya Karadkar to be Released , varkari Urges to Administration

    बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेसाठी प्रशासनाला साकडे ; साताऱ्यात वारकऱ्यांची धरपकड

    प्रतिनिधी

    सातारा : पायी दिंडी काढल्याप्रकरणी स्थानबद्द असलेले बंडातात्या कराडकर यांची सुटका करावी, या मागणीसाठी साताऱ्यात आज निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांचे कार्यालय येथे वारकरी संप्रदायातील मंडळी एकत्र येणार होती. तत्पूर्वी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी स्थानबद्ध केले. Bandatatya Karadkar to be Released , varkari Urges to Administration

    तसेच सातारा जिल्ह्यातील वारकरी आणि युवक यांची धरपकड सुरू झाली आहे. वारकरी आणि तरुणांनी शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये व जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन विलासबाबा जवळ यांनी केले.

    • बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेची मागणी
    •  पायी वारी काढल्याप्रकरणी आहेत स्थानबद्ध
    •  सुटकेचे निवेदन देण्यापूर्वी वारकऱ्यांची धरपकड
    •  विलासबाबा जवळ यांनाही केले स्थानबद्ध
    •  वारकऱ्यांत असंतोष, शांतता पाळण्याचे आवाहन
    •  जिल्ह्यातील वारकरी आणि युवक यांची धरपकड

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??