वृत्तसंस्था
मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना दोन महिने मासेमारी करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या बाबतचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. Ban on fishing in the maritime area of the state, Order of the Department of Fisheries; Applicable between June 1 and July 31
मासळी साठ्यांचे जतन व्हावे आणि पावसाळ्यात मच्छीमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत मासेमारीसाठी बंदी घातली आहे.
जून व जुलै महिन्यात मासळी प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी होत नाही.
राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास नौका, मासळीसह जप्त करण्यात येणार आहेत. तसेच दंडही ठोठावला जाईल.
Ban on fishing in the maritime area of the state, Order of the Department of Fisheries; Applicable between June 1 and July 31
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावरील उपचारासाठी बॅँका देणार वैयक्तिक कर्ज
- चीनचे नवे कुटुंब नियोजन धोरण जाहीर ; आता तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी
- ओबीसी आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले; नंतर फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले
- BIG BREAKING NEWS : देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर; शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट
- सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या विरोधकांना दिल्ली उच्च न्यायालयाची सणसणीत चपराक; पीआयएलचा गैरवापर केल्याबद्दल ठोठावला १ लाखांचा दंड