प्रतिनिधी
मुंबई : आज 6 डिसेंबर बाबरी मशीद पतनाचा दिवस. याच दिवशी लाखो कारसेवकांनी अयोध्येतील राम जन्मभूमीवरील बाबरी मशिद उध्वस्त केली. मात्र आज काही जिहादी तत्त्वांनी #babrimasjid जिंदा है, #BlackDay असे हॅशटॅग ट्विटरवर चालवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून रामाभक्तांनी #शौर्य_दिवस असा हॅशटॅग चालवत सोशल मीडियावर आघाडी घेतली आहे. babrimasjid, BlackDay’s strong reply on Twitter by shaurya_diwas
बाबरी मशीद नहीं भुलेंगे; PFI च्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत जमलेल्या लाखो कारसेवकांनी रामजन्मभूमीवरील बाबरी मशिद उध्वस्त करून गुलामीचे चिन्ह मिटवले. मात्र त्यावेळी काही लिबरल मीडियाने ही देशासाठी लांच्छनास्पद घटना असल्याचे रिपोर्टिंग केले होते. परंतु त्यावेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी बाबरी मशीद पतनाविषयी अजिबात पश्चाताप अथवा दुःख नाही. हा देशासाठी लांच्छनास्पद दिवस तर अजिबात नाही, उलट हा देशासाठी गर्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी भारताने गुलामीचे चिन्ह नष्ट केले, असे वक्तव्य केले होते. कल्याण सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
परंतु या दिवशीच काही जिहादी तत्वांनी #babrimasjid अभी जिंदा है, असा हॅशटॅग चालवला. त्याचबरोबर #BlackDay हॅशटॅगही चालवला. त्याला प्रत्युत्तर देत रामभक्तांनी #शौर्य_दिवस हॅशटॅग चालवला आहे.
babrimasjid, BlackDay’s strong reply on Twitter by shaurya_diwas
महत्वाच्या बातम्या
- मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन करा अर्ज
- भाजपची स्ट्रॅटेजी युती – प्रतियुती, आघाडी – प्रतिआघाडीच्या पलिकडची; एकूण मतदानातल्या 50 % वाट्याची!!
- सक्तीच्या धर्मांतर गंभीर मुद्दा; प्रतिज्ञापत्राद्वारे तोडगा सांगा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश; 12 डिसेंबरला पुढील सुनावणी