काँग्रेस आणि डावे पक्ष कधीही शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही. आता मला वाटत आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन हे टुकडे-टुकडे गँगने हायजॅक केलेले आहे, असा आरोप भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगट हिने केला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस आणि डावे पक्ष कधीही शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही. आता मला वाटत आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन हे टुकडे-टुकडे गँगने हायजॅक केलेले आहे, असा आरोप भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगट हिने केला आहे.
Babita Phogat accused of hijacking farmers movement tukade-tukade gang
Babita Phogat accused of hijacking farmers movement tukade-tukade gang
बबिताने याबाबत ट्विट केले आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करते की, त्यांना आपल्या घरी परत जावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही किसान बांधवांचे हक्क कमी करणार नाहीत. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित अनेक माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. या पार्श्वभूमीवर बबिता फोगट हिने मात्र कृषि कायद्याचे समर्थन केले आहे.