• Download App
    बाहुबली फेम प्रभासने एका वर्षामध्ये सोडले १५० कोटी रुपयांच्या जाहिरातीवर पाणी Baahubali Fame Prabhas Rejected 150 Crores Brand Endorsements In One Year

    बाहुबली फेम प्रभासने एका वर्षामध्ये सोडले १५० कोटी रुपयांच्या जाहिरातीवर पाणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बाहुबली फेम अभिनेता प्रभासने एका वर्षात १५० कोटी रुपयांच्या जाहिरातीवर पाणी सोडले आहे. Baahubali Fame Prabhas Rejected 150 Crores Brand Endorsements In One Year

    कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक तसचं एफएमसीजी अशा सर्वच क्षेत्रातील बड्या ब्रॅण्डच्या ऑफर प्रभासला आल्या होत्या. पण, त्या त्याने नाकारल्या आहेत.

    सेलिब्रिटी आणि मोठे ब्रॅण्डस् यांच नात फार जवळचं आहे. अनेक बडे सेलिब्रिटी नावलौकिकात अधिक भर पाडण्यासाठी आणि बक्कळ पैसा कमावण्याचं साधन म्हणून मोठ्या ब्रॅण्डस् सोबत हात मिळवणी करतात. बऱ्याच मोठ्या ब्रॅण्डसच्या जाहिरातींमध्ये अनेक बडे कलाकार तुम्ही पाहिले असतील.

    तसचं हे कलाकार कायम या ब्रॅण्डचं प्रमोशन करताना दिसतात. मात्र या सगळ्याला बाहुबली फेम प्रभास मात्र अपवाद ठरला आहे. पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी मिळेल त्या जाहिराती करणं किंवा ब्रॅण्डस् सोबत जोडलं जाणं प्रभासला पसंत नाही.

    प्रभासने गेल्या वर्षभरात अनेक मोठ्या ब्रॅण्ड एंडोर्समेंटला नकारल्या आहेत. कपड्यापासून इलेक्ट्रॉनिक तसचं एफएमसीजी अशा सर्वच क्षेत्रातील बड्या ब्रॅण्डच्या ऑफर प्रभासला आल्या होत्या. मात्र त्याने त्या नाकारल्या. सूत्रांच्या माहितीनुसार प्रभास हा घराघरात पोचलेला अभिनेता आहे. फक्त देशातच नव्हे तर जगभरात प्रभासची लोकप्रियता आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रॅण्डला प्रभासच्या नावाचा मोठा फायदा होवू शकतो. गेल्या वर्षभरात प्रभासने तब्बल १५० ब्रण्डच्या जाहिरातींसाठी नकार दिला आहे.

    Baahubali Fame Prabhas Rejected 150 Crores Brand Endorsements In One Year

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!