• Download App
    AURANGABAD : ना ढोल-ना तुतारी...राजेंच आगमन मध्यरात्री ? तेही शांततेत ? ठाकरे - पवार सरकार तुमच्या वेळेनुसार नव्हे तर शिवप्रेमिंचा इच्छेनुसार राजांच्या पुतळ्याचं अनावरण करा.... Aurangabad

    AURANGABAD : ना ढोल-ना तुतारी…राजेंच आगमन मध्यरात्री ? तेही शांततेत ? ठाकरे – पवार सरकार तुमच्या वेळेनुसार नव्हे तर शिवप्रेमिंचा इच्छेनुसार राजांच्या पुतळ्याचं अनावरण करा….

    ते राजे आहेत आणि ते वाजत गाजतच येणार ...


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी मध्यरात्री होणार आहे.  अनावरनाची वेळ अशी मध्यरात्री ठेवल्याने शिवभक्त चांगलेच संतापले आहेत . ठाकरे सरकारने स्वतःच्या उपब्धतेनुसार महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची वेळ दिली आहे ते देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.AURANGABAD: No drums, no celebration … CHATRAPATI arrives at midnight? Thackeray – Pawar government unveil the statue of kings not according to your time but according to the wishes of SHIVBHAKTA ….

    मागील अनेक दिवसांपासून राज्यकर्ते आणि शिवप्रेमी यांच्यात पुतळ्याच्या अनावरणावरून शाब्दिक संघर्ष सुरू होता, त्याला मंगळवारी पूर्णविराम देण्यात आला असला, तरी मध्यरात्रीच्या मुहूर्तावरून शिवजयंती उत्सव समिती, शिवप्रेमी जनतेतून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

    शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता करण्यात येणार आहे.
    कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन हजेरी लावतील तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वाधिक उंचीचे शिवछत्रपतींचे शिल्प क्रांती चौकात असून ते पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी घडविले आहे. चबुतरा व परिसराचे सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.

    सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांवर बंदी आहे. मग १२ वाजता राजेंचे आगमन शांततेत कसे पार पडणार? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला. त्यात नवीन वाद म्हणजे काल मध्यरात्री शिवजयंतीचे बॅनर काढल्याने चांगलाच वाद पेटला.

    यावर शिवभक्त आपल्या प्रतिक्रिया देत आहेत ….

    सरकारला वेळ नसल्यामुळे हा मुहूर्त
    सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दिवसा अनावरण करण्यासाठी वेळ नसल्याने हा मुहूर्त काढल्याचे दिसते आहे. अठरापगड जातीचे हे दैवत असून, दिवसा अनावरण केले असते तर आनंद द्विगुणित झाला असता. सरकारच्या या निर्णयामुळे शिवप्रेमी जनता त्यांना माफ करणार नाही.

    ना ढोल, ना ताशे, ना शिवप्रेमी
    ना ढोल, ना ताशे, ना शिवप्रेमी, फक्त शासकीय नियमांचे पालन करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणे हे खूप दुर्देवी आहे. शिवप्रेमींनी ज्या पुतळ्यासाठी तीन वर्षे वाट पाहिली, त्यांचा आता भ्रमनिरास होणार आहे. साजेसा आणि तोलामोलाचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. वेळेचा पुनर्विचार मनपाने करावा, अशी अपेक्षा आहे.

    AURANGABAD: No drums, no celebration … CHATRAPATI arrives at midnight? Thackeray – Pawar government unveil the statue of kings not according to your time but according to the wishes of SHIVBHAKTA ….

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!