दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मृत शेतकऱ्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनाचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यातून आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय किसान संघर्ष समितीकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मृत शेतकऱ्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनाचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यातून आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय किसान संघर्ष समितीकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Attempt to provoke farmers’ agitation by posting a photo of a farmer’s body two years ago
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून एका मृत शेतकऱ्याचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये म्हटले आहे की दुखी मनसे बता रहा हूॅँ, दिल्ली किसान मोर्चे में एक और किसान भाई शहीद हो गए. उनके इस शहादत को मैं कोटी कोटी नमन करता हूॅँ. त्यानंतर हजारो फेसबुक यूजर्सनेही हा फोटो शेअर केला.
Attempt to provoke farmers’ agitation by posting a photo of a farmer’s body two years ago
याबाबत अल्ट न्यूजने केलेल्या फॅक्ट चेकनुसार हा फोटो २०१८ सालचा आहे. सप्टेंबर २०२८ मध्ये तो फेसबुकवर शेअर केला होता. पंजाबमधील तरणतारण शहरातील बोहरी चौकातील अनोळखी शेतकऱ्याचा मृतदेह असल्याचे त्यामध्ये म्हटले होते.