वृत्तसंस्था
सांगली : कर्नाटकातील बेळगाव मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा सांगलीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. Attack on Marathi speakers; Strong protests in Sangli
समितीचे जिल्हा अध्यक्ष ,महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सदरचे आंदोलन करण्यात आलं. हा सीमा प्रश्न महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे ताबडतोब पाठपुरावा करून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांची होणारी कुचंबणा थांबवावी, त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे, मराठीची गळचेपी चालू आहे ती थांबवावी, बेळगाव सीमावर्ती भाग आणि बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, संतपुर बरोबर 850 गावे ही केंद्रशासित करावीत या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना समितीच्यावतीने देण्यात आले.
- मराठी भाषिकांवर हल्ला; सांगलीत जोरदार निदर्शने
- बेळगाव मधील अत्याचार थांबविण्याची मागणी
- बेळगाव मधील अत्याचार थांबविण्याची मागणी
- मराठी भाषिकांची होणारी कुचंबणा थांबवा
- बेळगावसह ८५० गावे ही केंद्रशासित करावीत