विशेष प्रतिनिधी
पुणे : “आज तुम्ही आमची खिल्ली उडवत आहात, पण एक दिवस असा येईल, की लोक तुमची खिल्ली उडवतील”. हे वाक्य आहे, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचं. जेव्हा फक्त एका मताच्या फरकाने त्यांचं सरकार कोसळलं होतं अन् भर संसद भवनात त्यांना अपमान सहन करावा लागला होता. Atal Bihari Vajpayee
सन १९९८ साली जेव्हा देशात भाजपाची सत्ता आली आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान बनले होते. त्या १९९८ च्या निवडणुकीनंतर भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली, शपथविधी झाला अन् देशाचा कारभार देखील सुरु झाला. पण सगळ्या गोष्टी सुरळीत होत असताना, देशात एक मोठी घडामोड घडली. ज्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षासोबत युती करून भाजपाने सत्ता स्थापन केली होती आणि त्याच्या विजयाच्या जोरावर अटलजी पंतप्रधान झाले होते. त्या अण्णा द्रमुक पक्षाच्या सुप्रीमो जयललिता यांनी थेट केंद्रात बंडखोरी केली. तेव्हा त्या एकूण १८ खासदारांना घेऊन सत्तेतून बाहेर पडल्या. तेव्हा त्यांच्या या बंडामुळे १९९८ साली सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला अवघ्या १३ महिन्यातच हादरे बसले होते.
त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. त्या अविश्वास प्रस्तावात सत्ताधारी भाजपाला २६९ मतं मिळाली, तर विरोधी पक्षाला २७० मतं मिळाली. तेव्हा त्या अवघ्या एका मताच्या फरकाने अटलजी अविश्वासास पात्र ठरले. आणि अवघ्या १३ महिन्यातच अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीतून पायउतार व्हावं लागलं. Atal Bihari Vajpayee
तेव्हा भाजपा हा सत्ताधारी पक्ष असून देखील अटलजींना पराभूत करणारं ते एक मत कुणाचं होतं? याचा शोध सुरु झाला, कित्येकांनी याबद्दल अंदाज बांधले. नंतर, या एका मताचा पूर्णपणे शोध घेतल्यावर लक्षात आलं, की ते एक मत कॉंग्रेसचे तत्कालीन खासदर गिरीधर गमंक यांचं होतं. खरं तर १९९८ साली गमंक ओडीसाचे मुख्यमंत्री होते. पण मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उमेदवाराला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. मात्र तेव्हा गमंक यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाच नव्हता. म्हणूनच जेव्हा अटल बिहारी वाजपाई यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्या एका अतिरिक्त मताचा कॉंग्रेसला फायदा झाला. त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयींना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. Atal Bihari Vajpayee
तेव्हा अवघ्या एका मताने अटल बिहारी वाजपाई यांचं सरकार कोसळलं, म्हणून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. कित्येक काँग्रेसी नेत्यांनी अटल बिहारी वाजपाई यांची खिल्ली उडवली. अन त्यांना अपमानित करायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत निरोपाचं भाषण केलं आणि “एक दिन भारत मे हमारी सरकार होगी और पुरा देश कॉंग्रेस पर हस रहा होगा”, ही भविष्यवाणी केली होती.
जी २०१४ साली खरी ठरली आणि कधीकाळी ज्या काँग्रेसी नेत्यांनी अटलजींची खिल्ली उडवली होती, त्याच काँग्रेसी नेत्यांचं २०१४ नंतर आजतागायत हसं होतंय अन् तेच कॉंग्रेसचे जेष्ठ नेते २०१४ नंतर भाजपावासी होण्याच्या तयारीला लागलेत. अटलजींच्या त्या भविष्यवाणी प्रमाणे आता देशातील काँग्रेसी नेत्यांवर नेस्तनाभूत होण्याची वेळ आली आहे. तर भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनलाय. यात सर्वात विशेष बाब म्हणजे ज्या गिरीधर गमंक यांच्या एका मतामुळे भाजपाचं सरकार पडलं होतं. तेच गमंक २०१५ साली भाजपावासी झाले अन् तेव्हा खऱ्या अर्थाने कॉंग्रेसचं हसं झालं. Atal Bihari Vajpayee