वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षाचे देशाचे नेते होते, उत्तम संसदपटू, माणुसकी, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.
देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले. देशाचे नेतृत्व कसे असते, याचा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्वाच्या विचारधारेशी तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे. देशाची एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण केले.
धर्मांधता, जात या दोन शब्दांना दूर ठेवून राजकारण कसं करता येतं हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्वावर भाजप शिवसेनेची युती झाली. त्याला अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठं योगदान दिले. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होते. देशाचे पंतप्रधान असताना एनडीएचे नेते असताना देशाच्या अनेक प्रश्नावर अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत असत.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे आजच्या भाजपाचे दोन स्तंभ आहेत. आजही अटलबिहारी वाजपेयी यांची आम्हाला सतत आठवण होते. कारगील युद्धाच्या वेळी त्यांच्या नेतृत्वाची कसोटी आम्ही पाहिली. त्याआधी पाकिस्तानसोबत प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतः बसने लाहोरला गेले होते मुशर्रफ यांना सुद्धा भेटले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होते पण राष्ट्र अभिमान कायम ठेवून त्यांनी काम केलं.त्यांचं स्मरण देशाला कायम राहील.
- अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य मार्गदर्शक
- संजय राऊत यांची जयंतीनिमित्त आदरांजली
- हिंदुत्वाशी तडजोड न करता एकात्मतेचे धडे
- भाजप- शिवसेना युतीचे वाजपेयी शिल्पकार
- वाजपेयी यांची आम्हाला सतत आठवण होते
- कारगील युद्धावेळी नेतृत्वाची कसोटी पाहिली
- राष्ट्र अभिमान कायम ठेवून त्यांनी काम केले
- त्यांचं स्मरण देशाला कायम राहील