- कोणाच्या दबावाने राजीनामा दिल्याचा अध्यक्षांना वाटला होता संशय
वृत्तसंस्था
कोलकत्ता : तृणमूळ काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी यांचा आमदराकीचा राजीनामा पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला assembly speaker biman banerjee accepts suvendu adhikaris resignation
सभापतींनी मला विचारले की तुम्ही स्वेच्छेने राजीनामापत्र तयार करुन सादर केले आहे का? ज्यावर मी हो असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला आहे, असे पश्चिम बंगालमधील मात्तबर नेते सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. assembly speaker biman banerjee accepts suvendu adhikaris resignation
तृणमूल काँगेसचे आमदार असलेले अधिकारी यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. पण, त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे सभापती बिमन बॅनर्जी यांनी मंजूर केला नव्हता.
assembly speaker biman banerjee accepts suvendu adhikaris resignation
त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांनी बिमन बॅनर्जी यांची आज राज्य विधानसभेत भेट घेतली. टीएमसीचा राजीनामा दिल्यानंतर सभापती बिमान बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना आज त्यांच्यासमोर हजर होण्यास सांगितले होते. assembly speaker biman banerjee accepts suvendu adhikaris resignation
अधिकारी आज माझ्यासमोर हजर झाले आणि मला सांगितले की त्यांनी दुसर्या कोणाचाही प्रभाव न पडता राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा ऐच्छिक व अस्सल असल्याची मला खात्री आहे. मी त्यांचा राजीनामा तातडीने स्वीकारतो.