• Download App
    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका | The Focus India

    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

    हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा! असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. Ashish Shelar’s criticism of Shiv Sena

    राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर जनतेनं बंद पाळण्याचंही आवाहन केलं आहे. शिवसेनेनं जाहीर केलेल्या भूमिकेवरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या भूमिकेची आठवण करून देत शिवसेनेवर टीका करताना म्हटले आहे की, आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!

    शेलार म्हणाले की, दिल्लीत लोकसभेत शिवसेनेचा सीएए आणि कृषी विधेयकाला पाठिंबा आणि राज्यसभेत विरोध, महाराष्ट्रात प्रथम समृद्धी महामागार्ला विरोध आता श्रेयासाठी पाहणी दौरे सुरु, मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो बाबतही अशाच आप-मतलबी भूमिका, दिल्ली ते गल्ली दल बदलू कार्यक्रम सुरुच!

    भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचं ४८ वर्ष दोन महिने सरकार होतं. देशात ५२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं सरकार होतं. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो, मग त्या कृषी क्षेत्रात असं काय झालं? का व्याख्या बदलली याचं कधी चिंतन केलं का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झाला. त्याला आपण पॉलिटिकल अल्झायमर हा शब्द वापरू शकतो.

    Ashish Shelar’s criticism of Shiv Sena

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…