विशेष प्रतिनिधी
मुंबईः राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणे म्हणजे नामर्दपणा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. आता यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे. कंगना राणावतचे ऑफिस बुलडोझरने पाडले तो मर्दपणा होता का?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. Ashish Shelar targets Shivsena on ED notice
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटिस बजावण्यात आल्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. राऊतांनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. Ashish Shelar targets Shivsena on ED notice
Ashish Shelar targets Shivsena on ED notice
‘कंगना राणावतच घर तोडताना शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का? कंगना राणावतला मुंबईत येऊ देणार नाही, अशी भूमिका घेणे मर्दपणा होता का?,’ असे सवाल शेलार यांनी केले आहेत. तसेच, ‘आधी शिवसेनेने स्वतःकडे बघावं, स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली आहे,’ असा टोलाही लगावला आहे.