• Download App
    बाबरीवरून ओवेसींची विषारी गरळ सुरूच, सब कुछ याद रखा जाऐगाची धमकी | The Focus India

    बाबरीवरून ओवेसींची विषारी गरळ सुरूच, सब कुछ याद रखा जाऐगाची धमकी

    सर्वोच्च न्यायालयानाचे निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुढच्या पिढ्यांनाही ही आठवण देत राहावी, असे आवाहन केले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुढच्या पिढ्यांनाही ही आठवण देत राहावी, असे आवाहन केले आहे. asaduddin Owesi’s poisonous grunt continues from Babri, threatening to remember everything

    अयोध्येतील बाबरी मशीदीचे ६ डिसेंबर १९९२ रोजी पतन झाले होते. या निमित्ताने एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. अयोध्येत बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती याची आठवण येणाऱ्या पिढ्यांना द्यावी. आमच्या पूर्वजांनी तेथे एकत्रितपणे नमाज अदा केलेली होती. तेथे त्यांनी आपले रोजे देखील सोडले होते. जेव्हा त्यांचा मृत्यू होत असे तेव्हा त्यांना याच परिसरात आसपास दफन केले जात असे.

    ओवेसी यांनी गरळ ओकताना म्हटले आहे की, हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. आजच्याच दिवशी १९९२ मध्ये संपूर्ण जगासमोर आमची मशीद ध्वस्त करण्यात आली होती. जे याला जबाबदार होते, त्यांना एका दिवसाची देखील शिक्षा मिळाली नाही.
    बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सतीश प्रधान, विनय कटियार यांच्यासह सर्वच्या सर्व ३२ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

    या निकालानंतर एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, “सीबीआय न्यायालयाने दिलेला हा निर्णय भारतातील एक काळा दिवस आहे. जादूने ही मशीद पडली का? जादूने टाळे उघडले गेले होते का? न्यायालयाच्या निकालाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बॉर्डने आव्हान द्यावं असं आवाहनही असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. मात्र, लॉ बोर्डाने त्याला प्रतिसाद दिला नव्हता.

    asaduddin Owesi’s poisonous grunt continues from Babri, threatening to remember everything

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…