- शिवसेना मुस्लिमविरोधी असतानाही सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना दिलंय धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट..!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मशीदीवरील भोंगे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा ही मागणी शिवसेनेने केल्यावर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. तरीही मुस्लिम विरोधी असलेल्या शिवसेनेला धर्मांध म्हणून शकत नाही, कारण त्यांना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट दिले आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. asaduddin owaisi latest
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून मशीदीवरील भोंगे बंद करण्यासाठी कायदा करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरण रक्षणसाठी भोंगे बंद करावेत,असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने म्हटले आहे की मशीदीवरील भोंगे बंद करून ध्वनी प्रदूषण बंद व्हावे यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. asaduddin owaisi latest
यापूर्वी शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग संकपाळ यांनी मुस्लिम मुलांसाठी अझानची स्पर्धा घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेनेवर टीका झाली होती. त्यामुळे आपली हिंदूत्ववादी भूमिका जपण्यासाठी शिवसेनेने मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा उकरून काढला आहे.
asaduddin owaisi latest
यावर संताप व्यक्त करताना ओवेसी म्हणाले, भोंग्यांचा आवाज नियंत्रित ठेवण्यासाठी पुर्वीपासूनच कायदा आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमविरोधी राजकारण करताना ही वस्तूस्थिती लक्षात घेतली जात नाही त्याला काय करणार? पण शिवसेनेला धर्मांधही म्हणू शकत नाही, कारण शिवसेनेला कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच धर्मनिरपेक्ष असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे.