वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील झवेरी बाजारात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चार ठिकाणी छापे घालून सराफा व्यापाऱ्याकडून तब्बल 92 किलो सोने आणि 330 किलो चांदी जप्त केली आहे, ईडीच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. As many as 92 kg of gold and 330 kg of silver were seized from Zaveri Bazar in Mumbai
मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सशी संबंधित ही छापेमारी होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवले. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीचा या कारवाईचा संबंध आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
8 मार्च 2018 रोजी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीने बँकांना फसवून 2296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैसे पाठवले होते. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक प्रदान करण्याच्या, कर्ज घेण्यासंदर्भात कोणतेही करार झालेले नाहीत. यापूर्वी ईडीने 46.97 कोटी आणि 158.26 कोटी रुपये जप्त केले आहेत.
या आढळल्या त्रुटी
झडतीदरम्यान परिसरात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. मेसर्स रक्षा बुलियनच्या खाजगी लॉकर्सची झडती आज घेतली गेली. ईडीच्या छापेमारीत योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते. केवायसीचे पालन केले गेले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. आत आणि बाहेर कोणतेही रजिस्टर नव्हते असे दिसून आले.
761 लॉकर्स समोर
लॉकर परिसराची झडती घेतली असता 761 लॉकर्स असल्याचे समोर आले आहेत. मेसर्स रक्षा बुलियन. लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. 2 लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून यातील अतिरिक्त 188 किलो चांदी जप्त केली आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.
As many as 92 kg of gold and 330 kg of silver were seized from Zaveri Bazar in Mumbai
महत्वाच्या बातम्या