• Download App
    “खोडी काढल्या”चा ट्विटरला जाब विचारणार; संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे ट्विट As Chairman of the Parliamentary Standing Committee on Information Technology, I can state that we will be seeking an explanation from @TwitterIndia

    “खोडी काढल्या”चा ट्विटरला जाब विचारणार; संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे ट्विट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या मुद्द्यावर ट्विटर इंडियाला जाब विचारणा असल्याचे ट्विट आयटी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. रविशंकर प्रसाद यांच्याबरोबरच शशी थरूर यांचाही ट्विटर अकाऊंट ऍक्सेस ट्विटरने काही काळ काढून घेतला होता. त्यावरच शशी थरूर यांनी ट्विट करून ट्विटर कंपनीला याबाबत जाब विचारणार असल्याचे सांगितले. As Chairman of the Parliamentary Standing Committee on Information Technology, I can state that we will be seeking an explanation from @TwitterIndia

    -रविशंकर प्रसाद यांची ट्विटरवर टीका

    केंद्र सरकारने लागू केलेला नवा आयटी कायदा पाळण्याबाबत ट्विटर हयगय करीत असताना वादात आज ट्विटर कंपनीने नवीन भर घातली. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अकाऊंटचा ऍक्सेस ट्विटरने तासभर काढून घेतला. हा प्रकार काय हे लक्षात घेऊन रविशंकर प्रसाद यांनी koo ऍपवरून एकापाठोपाठ एक पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आणि काहीही केले तरी भारतीय कायदे ट्विटर कंपनीला पाळावेच लागतील, असा इशारा देखील दिला.

    भारतीय आयटी कायद्यातील काही कलमे ट्विटर पाळत नसल्याचे लक्षात आल्याने ट्विटरला केंद्र सरकारने काही स्पष्टीकरणे मागितली आहेत. रविशंकर प्रसाद यांनी सर्व कंपन्यांना या संबंधीचे इशारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर अकांऊटचा ऍक्सेस तासभर काढून घेतला. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचा संबंधित अकाऊंटकडून भंग होत असल्याचे कारण ट्विटरने यासाठी दिले.

    पण नंतर ट्विटर अकाऊंटवरच याबाबतची नोटीस देऊन कंपनीने रविशंकर प्रसादांचे अकाऊंट पुन्हा सुरू केले. परंतु, दरम्यानच्या काळात रविशंकर प्रसादांनी koo ऍपवरून एका पाठोपाठ एक पोस्ट करून ट्विटरच्या कारवाईला अनुचित ठरविले आणि ट्विटरने काहीही केले तरी त्यांना भारताचा नवा आयटी कायदा पाळावाच लागेल, असा इशारा दिला. ट्विटर स्वतःला अविष्कार स्वातंत्र्याचे अग्रदूत समजत असले, तरी ते तसे नाहीत. त्यांना त्यांचा अजेंडा भारतात चालवायचा आहे. फक्त स्वतःचा व्यावसायिक फायदा बघणाऱ्या कंपन्यांनी भारताला अविष्कार स्वातंत्र्यांचे लेक्चर देऊ नये, अशी टीकाही रविशंकर प्रसाद यांनी केली.

    पण ट्विटरच्या या डिजिटल दादागिरीला रविशंकर प्रसादांनी koo ऍपवरून उत्तर दिल्याने सोशल मीडियात याची चर्चा चांगलीच रंगली. आतापर्यंत कोणत्याही भारतीय टीव्ही चॅनेलने किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मी वापरलेल्या कंटेटच्या कॉपीराईटबद्दल विचारणा केलेली नाही, याकडेही रविशंकर प्रसादांनी koo ऍपवरून लक्ष वेधले.

    As Chairman of the Parliamentary Standing Committee on Information Technology, I can state that we will be seeking an explanation from @TwitterIndia

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य