• Download App
    Aryan Khan, son of Bollywood superstar Shah Rukh Khan, after a day-long interrogation in the Rev. Party case

    पोरगं देतेय एनसीबीला नशेची कबुली; बॉलिवूड गोळा होतेय बापा भोवती!!

    नाशिक : “पोरगं देतेय एनसीबीला नशेची कबुली आणि बॉलिवूड गोळा होतेय बापा भोवती…!!” अशी अवस्था आज मुंबई दिसून येत आहे. Aryan Khan, son of Bollywood superstar Shah Rukh Khan, after a day-long interrogation in the Rev. Party case

    गोवा क्रूज रेव्ह पार्टी प्रकरणात दिवसभराच्या चौकशीनंतर बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला त्याच्या तीन मित्रांसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. त्यानंतर बॉलिवूडमधल्या कलावंतांनी शाहरुख खानला सहानुभूती दाखवायला सुरुवात केली आहे. इतरांवर “व्हिक्टिम कार्ड” खेळण्याचा आरोप करणारे बॉलिवूडकर आता जेव्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कायदेशीर कारवाई करून आर्यन खानला अटक केली त्यावेळी तेच “व्हिक्टिम कार्ड” खेळत शाहरुख खान भोवती गोळा व्हायला लागले आहेत.

    याची सुरुवात अभिनेता सुनील शेट्टीने केली. आता गायिका – अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने देखील शाहरुख खानला सहानुभूती दाखवली आहे. आपला मुलगा नशेत असल्याचे पाहणे कोणत्याही आई-वडिलांना जड जाते. आत्तापर्यंत बॉलिवूडवर अनेक छापे पडले. पण कुठेही काहीही सापडले नाही आणि सिद्ध होऊ शकले नाही. काही लोक याचा तमाशा बनवतात आणि आपण पहात राहतो, अशा शब्दांमध्ये सुचित्रा कृष्णमूर्ती हिने शाहरुख खान आणि गौरी खान यांना सहानुभूती दाखवली आहे.

    सुनील शेट्टीने सकाळीच अजून काही सिद्ध झालेले नाही वगैरे भाषा वापरून शाहरुख खानला सहानुभूती दाखवण्याची सुरुवात केली होती. त्या पाठोपाठ अनेक जण बाहेर यायला लागले आहेत.

    अर्थात नेटिझन्सनी ड्रग्ज प्रकरणात कठोर टीका केली आहे. “उडता पंजाब” सिनेमा बनवून पंजाबची बदनामी करणारे बॉलिवूड स्वतः “उडते बॉलिवूड” झाले तेव्हा कलावंत का गप्प बसलेत?, असे सवाल नेटिझन्सनी केले आहेत. अनेकांनी विविध प्रकारच्या मीम्स सादर करून अमिर खान, जावेद अख्तर, स्वरा भास्कर आदी कथित लिबरल्सना या प्रकरणात घेरले आहे. कारण त्यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर देखील मूग गिळून बसणे पसंत केले आहे.

    Aryan Khan, son of Bollywood superstar Shah Rukh Khan, after a day-long interrogation in the Rev. Party case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!