वृत्तसंस्था
मुंबई : मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा असलेल्या मुंबईहून गोव्याला जाणा-या क्रूझवर एनसीबीने शनिवारी रात्री खोल समुद्रात छापेमारी केली. यावेळी 8 जणांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आजच्या चौकशीनंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह तिघांना एनसीबीने अटक केली आहे.Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha, who were detained in connection with the raid at a party
चौकशीदरम्यान एनसीबीला दिलेल्या माहितीत आर्यन खानने आपण ड्रग्स क्रूझवर कसे नेले याबाबतचा खुलासा केला असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.
चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सर्वांची एनसीबीने कसून चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीवरुन एनसीबीने आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. या आठ जणांमध्ये आर्यन खान याचाही समावेश आहे. आर्यन खानसह मूनमून धमेचा, अरबाझ मर्चंट यांना एनसीबीने अटक केली आहे. या तिघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यानंतर मग किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आर्यन खानच्या चौकशीमध्ये एनसीबीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. लेन्सच्या कव्हरमध्ये आर्यन ड्रग्स घेऊन गेला होता, असा त्याच्यावर आरोप असून तो ते ड्रग्स स्वतः घेण्यासाठी घेऊन आला होता, अशी कबुली आर्यनने दिल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
– आर्यन खान, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोक्कर, गोमित चोप्रा, मूनमून धमेचा, अरबाझ मर्चंट
Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha, who were detained in connection with the raid at a party
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला