• Download App
    Artificial Kidney : 'ब्लड प्रेशर'च्या सपोर्टवर चालणार कृत्रिम किडनी ; डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटच्या त्रासातून मुक्ती ; जाणून घ्या Artificial Kidney: Artificial Kidney to run on the support of 'Blood Pressure'; Relief from the discomfort of dialysis and transplant; Find out

    Artificial Kidney : ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार कृत्रिम किडनी ; डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटच्या त्रासातून मुक्ती ; जाणून घ्या

    • शास्त्रज्ञांनी चक्क एक कृत्रिम किडनी (First Artificial Kidney) तयार केली आहे, जी खऱ्या किडनीप्रमाणेच काम करील. अमेरिकेतल्या राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधकांच्या एका पथकाने ही किमया करून दाखवली आहे. हे सर्व संशोधक दी किडनी प्रोजेक्टचा (The Kidney Project) भाग आहेत. किडनीसंबंधी आजारावर बायोआर्टिफिशिअल किडनी (Bioartificial Kidney) बनवण्याच्या उद्देशाने हे सर्व तज्ज्ञ संशोधन करत आहेत.

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन :किडनीचा विकार (Kidneydiseas e) झाल्यानंतर आपल्याकडे दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant) आणि दुसरा म्हणजे डायलिसिस (Dialysis) . हे दोन्ही पर्याय अत्यंत खर्चिक असतात, तसेच ते तेवढे खात्रीशीरही नसतात; पण आता किडनीचा आजार झालेल्या रुग्णांसाठी चांगली बातमी समोर आली आहे.Artificial Kidney: Artificial Kidney to run on the support of ‘Blood Pressure’; Relief from the discomfort of dialysis and transplant; Find out

    संशोधकांनी एक अशी कृत्रिम किडनी (artificial kidney) तयार आहे जी इम्प्लांटेबल बायोआर्टिफिशियल किडनी (implantable bioartificial kidney) आहे.

    यामुळे डायलिसिस मशीन्स आणि ट्रान्सप्लांटसाठी दिर्घ प्रतिक्षा तसेच त्रासापासून सुटका होणार आहे.

    हा किडनी प्रकल्प एक राष्ट्रीय संशोधन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे नाव किडनीएक्स (KidneyX) असून त्याचे लक्ष्य किडनी फेलियरच्या उपचारासाठी सूक्ष्म, मेडिकल ट्रान्सप्लांट आणि बायोआर्टिफिशियल कृत्रिम किडनी तयार करणे आहे. किडनीएक्स अमेरिकन आरोग्य आणि मानवसेवा विभाग आणि अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीमध्ये एक सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे.

    छोटा आहे डिव्हाईस

    रिपोर्टनुसार किडनी प्रोजेक्टने आपल्या कृत्रिम किडनीमध्ये दोन महत्वाचे भाग हेमोफिल्टर आणि बायोरिअ‍ॅक्टर (hemofilter and bioreactor) ला जोडले. प्री-क्लिनिकल देखरेखीसाठी स्मार्टफोनच्या आकाराचे उपकरण यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केले.

    मागील काही वर्षात द किडनी प्रोजेक्टने वेगवेगळ्या प्रयोगात हेमोफिल्टर आणि बायोरिअ‍ॅक्टरची यशस्वीपणे चाचणी केली. हेमोफिल्टर रक्तातून विषारी किंवा टाकाऊ घटक हटवते. तर बायोरिअ‍ॅक्टर रक्तात इलेक्ट्रोलाइट्स संतुलनासारखे कार्य करते.

    ही कृत्रिम किडनी (Artificial Kidney) चांगले जीवन देईल, अनेक त्रासापासून मुक्ती देईल, रूग्णांना औषधांचे साईडइफेक्ट्स आणि आजारांपासून सुद्धा वाचवेल.

    कृत्रिम मानवी किडनी पेशींना मदत करेल, इम्यून रिस्पॉन्स सुद्धा तिला बाहेरील पदार्थ समजून विरोध करणार नाही.

    संशोधक म्हणाले, आता आम्हाला आणखी कठोर प्री-क्लिनिकल चाचणीसाठी तंत्रज्ञान आणखी प्रगत करावे लागेल. जेणेकरून निकालामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुकीला वाव राहणार नाही.

    Artificial Kidney: Artificial Kidney to run on the support of ‘Blood Pressure’; Relief from the discomfort of dialysis and transplant; Find out

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!