वृत्तसंस्था
पुणे : महाराष्ट्रातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफसह लष्कर तसेच आणि नौदलालाही पाचारण करण्यात आले आहे. या तिन्ही शाखा सर्व स्तरावर बचाव कार्य करण्यात सक्षम आहेत,अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली.
तसेच मुख्यमंत्री तर स्वतः कंट्रोल रूममध्ये बसून पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जयंत पाटील हे पिंपरी चिंचवड एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा ते बोलत होते.
गुरुवारी रात्रीपासून कोल्हापूर, सांगली भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे . कारण कोयना धरणात २४तासात १२ टीएमसी पाणी सोडले. त्यामुळे पाणी पातळी वाढलेली आहे.
- एनडीआरएफसह लष्कर, नौदलाला पाचारण
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती
- बचाव कार्य करण्यात सक्षम
- मुख्यमंत्र्यांचे पूर परिस्थितीवर लक्ष आहे
- कोल्हापूर, सांगलीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे