Armoured truck Cash bags dropped : अमेरिकेतील एका शहरात रस्त्यावर पैशांचा पाऊस पडला आणि त्यानंतर नोटा लुटण्यासाठी लोकांची झुंबडही पाहायला मिळाली. ही घटना दक्षिण कॅलिफोर्निया महामार्गावर घडली, जेव्हा एका सशस्त्र ट्रकमधून डॉलरने भरलेल्या पिशव्या पडल्या. बॅग पडल्यानंतर ती हिसकावण्यासाठी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये बाचाबाची झाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कार्ल्सबाडमधील आंतरराज्यीय मार्ग 5 वर सकाळी 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. Armoured truck Cash bags dropped on Highway Southern California USA Watch video
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका शहरात रस्त्यावर पैशांचा पाऊस पडला आणि त्यानंतर नोटा लुटण्यासाठी लोकांची झुंबडही पाहायला मिळाली. ही घटना दक्षिण कॅलिफोर्निया महामार्गावर घडली, जेव्हा एका सशस्त्र ट्रकमधून डॉलरने भरलेल्या पिशव्या पडल्या. बॅग पडल्यानंतर ती हिसकावण्यासाठी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये बाचाबाची झाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कार्ल्सबाडमधील आंतरराज्यीय मार्ग 5 वर सकाळी 9.15 च्या सुमारास ही घटना घडली.
कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल सार्जंट क्युट्रिस मार्टिन म्हणाले, “वाहनाचा एक दरवाजा उघडला आणि रोख रकमेची बॅग बाहेर पडली.” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावरील पैसे लुटताना दिसत आहेत. यावेळी रस्त्यावर विखुरलेल्या नोटाही दिसल्या. त्याचवेळी गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी महामार्गावर वाहने थांबवण्यात आली. यानंतर लोक आपापल्या वाहनांमधून बाहेर पडले आणि नंतर नोटा लुटण्यास सुरुवात केली. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी वाहने थांबविण्याचा निर्णय घेतला.
पैसे परत करण्याचे आवाहन
ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांना ते सीएचपी कार्यालयात परत करण्याची विनंती केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सॅन दिएगो युनियन ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे की, किती रोख रक्कम गायब झाली आहे हे अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही. मात्र किमान 12-13 जणांनी पैसे परत केले आहेत. कॅट्रिस मार्टिन यांनी सांगितले की, लोकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन पैसे परत केले आहेत. ते म्हणाले की, जेव्हा डॉलरने भरलेली बॅग पडली तेव्हा लोकांना खूप पैसे मिळाले. सकाळी 11 वाजता महामार्ग पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला.
Armoured truck Cash bags dropped on Highway Southern California USA Watch video
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण
- टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवरून वाद, हलाल मीट अनिवार्य करण्यावरून नेटकऱ्यांचा बीसीसीआयवर संताप
- मोठी बातमी : इंधनाचे दर कमी करण्यासाठी भारताची आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल सोडण्याची तयारी
- खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण
- 26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल