विशेष प्रतिनिधी
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात घडलेलं अँटेलिया बॉम्ब प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात NIA ने जी चार्जशीट फाईल केली आहे त्यामध्ये सचिन वाझेने हे का केलं यामागचं कारण सांगितलं आहे. अँटेलिया समोर जी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली ती त्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझेच होता हे आता स्पष्ट झालं आहे. अशात आता हे सगळं त्याने का केलं हे कारणही समोर आलं आहे.सिक्रेट मिशन आहे असं सांगत सहकार्याला सोबत घेतले होते.Antilia Bomb Episode: Secret Mission! Sachin Waze wanted money from Mukesh Ambani – NIA … Read detailed report
NIA च्या चार्जशीटनुसार सचिन वाझे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. अंबानी यांच्या घरासमोर MH01-DK 9945 या फेक रजिस्टर्ड नंबरची स्कॉर्पिओ त्यानेच ठेवली होती. या कृत्यात त्याला काही जणांनी साथ दिली होती. जिलेटीनच्या कांड्या असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवणं ते मनसुख हिरेनची हत्या या सगळ्याचा कट सचिन वाझेनेच फुलप्रुफपणे आखला होता.
मनसुख हिरेनला त्याने स्कॉर्पिओ हरवली आहे अशी तक्रार दाखल करण्यास सांगितलं. हीच स्कॉर्पिओ कार स्फोटकं ठेवण्यासाठी त्याने वापरली. चोरीला गेलेली स्कॉर्पिओ ही मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर कुणीतरी सोडून गेलं आहे त्यामध्ये स्फोटकं आणि धमकीचं पत्र आहे हे वाझेला भासवायचं होतं आणि त्या बदल्यात मुकेश अंबानी यांच्याकडून पैसे उकळायचे होते. तसंच हे सगळं प्रकरण सोडवून सुपरकॉप म्हणून आपली प्रतिमा तयार करायची होती हा या कटामागचा सचिन वाझेचा प्रमुख उद्देश होता.
यामध्ये तो सफल झाला असता तर त्याने आणखी काही श्रीमंत व्यक्तींनाही अशाच प्रकारे घाबरवलं असतं. मुकेश अंबानींना घाबरवायचं आणि पैसे उकळायचे तसंच आपणच सगळा कट रचून ते प्रकरण सोडवलं असं दाखवायचं असं सचिन वाझेला वाटत होतं पण तो यशस्वी झाला नाही.
NIA च्या चार्जशीटनुसार Carmichael road या ठिकाणी म्हणजेच मुकेश अंबानी यांचं घर असलेल्या अँटेलियाच्या समोर सचिन वाझेने स्कॉर्पिओ सोडली. त्यामध्ये त्याने जिलेटिनच्या कांड्याही ठेवल्या. हे सगळं सचिन वाझेसोबत त्याच्या मागे इनोव्हा कारमध्ये आलेल्या त्याच्या एका सहकाऱ्याने पाहिलं होतं.
सचिन वाझेने त्यादिवशी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तसंच आपला चेहरा दिसू नये म्हणून त्याने रूमाल बांधून तोंड झाकलं होतं. आपली ओळख पटणार नाही याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती असं या प्रकऱणातील मुख्य साक्षीदाराने सांगितलं आहे.
आधी सगळा कट रचायचा त्यानंतर आपणच तपास अधिकारी म्हणून केस हातात घ्यायची त्यानंतर अंबानींकडून पैसे उकळायचे हा सचिन वाझेचा मुख्य उद्देश होता.