विशेष प्रतिनिधी
बीड : विलीनीकरणाच्या मागणीसाठी बीड आगारात मागील २२ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान हुबेहूब परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासारखे दिसणारे एक एसटी कर्मचारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.
अशोक जाधव, असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते गेवराई आगारात चालक आहेत. आंदोलनात त्यांचा सहभाग प्रामुख्याने आहे. बीड आगारात 26/11 घटनेतील शहिदांना आदरांजली अर्पण करून केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विलिनीकरणाची मागणी देखील मान्य करावी, अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे केली.
– एसटी कर्मचारी आंदोलनात अनिल परब सहभागी
– हुबेहूब अनिल परब यांच्यासारखे दिसणारे कर्मचारी
– अशोक जाधव, असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव
– कर्मचाऱ्यांनी मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या
– विलिनीकरणाची मागणी मान्य करण्याचा आग्रह
Anil Parab participates in ST workers movement