विशेष प्रतिनिधी
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा अहवाल लिक करणारे सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी आणि त्यांचे वकील आनंद डागा या दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने या दोन्ही आरोपींची कोठडी वाढवण्याची मागणी केली. या दोघांच्या मोबाईलमधून बराच डेटा समोर आला आहे. त्यामुळे त्यांची सातत्याने चौकशी केली जाते आहे असंही सीबीआयने म्हटलं आहे.Anil Deshmukh: Anil Deshmukh’s lawyer and CBI officer who leaked report remanded in judicial custody for 14 days
सीबीआयच्या मागणीवर कोर्टाने हे विचारलं आहे की तुम्ही आत्तापर्यंत काय काय माहिती मिळवण्यात यशस्वी झालात? काही रिकव्हरी झाली का? कोणतीही रिकव्हरी झाली नसल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. मात्र डेटा अॅनालिसिस सुरू आहे. त्यामुळे या दोघांच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली. सीबीआयने आणखी पाच दिवसांची कोठडी वाढवून मागितली.
दरम्यान आरोपींच्या वकिलांनी कोर्टात हा युक्तिवाद केला की जर डेटा अॅनालिसिस सुरू आहे तर मग कोठडीची गरजच काय? त्यांना कधीही बोलावून चौकशी केलाी जाऊ शकते. ज्यावर सीबीआयने असं म्हटलं आहे की काही नावं समोर येत आहेत. ती नावं या स्टेजला जाहीर करू शकत नाही त्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी सीबीआयकडून सध्या तपास सुरु आहे. असं असताना अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा हे पोलीस उपनिरिक्षक तिवारी यांच्या माध्यमातून तपास कार्यावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा आणि त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना 1 सप्टेंबरच्या रात्री सीबीआयने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली होती. मात्र, 2 सप्टेंबरला वकील आनंद डागा यांना मात्र अटक करण्यात आली आहे. तसंच त्या सीबीआय अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली.
Anil Deshmukh: Anil Deshmukh’s lawyer and CBI officer who leaked report remanded in judicial custody for 14 days