• Download App
    सुनावणीसाठी कंगना उपस्थित नसल्याने न्यायालयाचा संताप, पुढील वेळी गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट Anger of the court for Kangana not appearing for the hearing, arrest warrant if she is absent next time

    सुनावणीसाठी कंगना उपस्थित नसल्याने न्यायालयाचा संताप, पुढील वेळी गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट

    प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीवर अंधेरी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कंगना उपस्थित नसल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढू असा इशारा दिला आहे. २० सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. Anger of the court for Kangana not appearing for the hearing, arrest warrant if she is absent next time


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीवर अंधेरी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कंगना उपस्थित नसल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. पुढील सुनावणीला कंगना रनौट गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढू असा इशारा दिला आहे. २० सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.



    जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेत अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगनाची मागणी उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली होती. कारवाई सुरू करण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश बेकायदा नाही, त्यात अनियमितता नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने नमूद केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने कंगनाने अंधेरी कोर्टात हजर होणं आवश्यक होतं.

    कंगनाला कोरोनाची लक्षणं आढळली असून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप रिपोर्ट आलेला नाही अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांच्याकडून देण्यात आली. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावर भारद्वाज यांनी गेल्यावेळीदेखील कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहील सांगत गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती याकडे लक्ष वेधलं.

    Anger of the court for Kangana not appearing for the hearing, arrest warrant if she is absent next time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!