ईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : ईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले. Amit Shah two-day tour begins in northeastern states
ईशान्य भारतातील राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असताना शहा बोलत होते. त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन झाले. ते म्हणाले की, एके काळी या सगळ्या राज्यांमध्ये विघटनवादी आपला अजेंडा चालवित होते. युवकांच्या हातात बंदुका दिल्या होत्या. आता या सगळ्या विघटनवादी संघटना मुख्य प्रवाहात सामील झाल्या आहेत. येथील युवक आपल्या नव्या स्टार्ट-अपने जगभरातील युवकांशी स्पर्धा करत आहेत. आपल्या अष्टलक्ष्मीला भारताची अष्टलक्ष्मी करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत आहेत.
शहा म्हणाले की, गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सवार्नंद सोनवाल आणि हेमंत विश्वास शर्मा यांची जोडी विकासाच्या दिशेने आसामला अग्रेसर करत आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१३ च्या निवडणूक प्रचारात सांगितले होते की जोपर्यंत पूर्व भारत विकसित होणार नाही तोपर्यंत भारताचा विकास झाला असे म्हणता येणार नाही. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा शब्द खरा करत आसाम आणि सातही इशान्येकडील राज्यांमध्ये विकास घडविला आहे.
Amit Shah two-day tour begins in northeastern states
एकेकाळी येथील वातावरण आंदोलनांनी दुषित झाले होते. वेगवेगळ्या मुद्यांवर आंदोलने झाली. यामध्ये शेकडो युवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आसाममध्ये अशांतता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत येथील वातावरण पुर्णत: बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. येथील दर पंधरा लाख लोकसंख्येसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येणार असल्याचे शहा यांनी सांगितले.