वृत्तसंस्था
टेक्सास : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह अनेक देशांत मास्क घालणे बंधनकारक आहे. पण, मास्कविरोधात चळवळ उभारणाऱ्या एकाचा कोरोना संसर्गामुळेच मृत्यू झाला आहे. कालेब वालेस, असे त्याचे नाव आहे. American citizen who staged anti-mask rally Died Due to Corona ; The rally was held in Texas
गेल्या काही दिवसांपूर्वी ३० वर्षीय कालेब वालेस याला कोरोनाची लागण झाली होती. तो एक महिना रुग्णालयात दाखल होता. ८ ऑगस्टपासून तो व्हेंटिलेटरवर होता. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोरोनाने जेव्हा जगभरात थैमान घातले होते, तेव्हा अमेरिकेतील टेक्सासमध्ये कालेब वालेसने मास्कविरोधी चळवळ सुरु केली होती.
मास्क आणि अनेक निर्बंधांना कालेब वालेसने तीव्र विरोध केला. त्यासाठी एक संघटना स्थापन केली. गेल्या वर्षी जुलैमध्ये सेंट्रल टेक्सासमध्ये मास्कच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढला होता. त्याने त्याला ‘स्वातंत्र्य रॅली’ असे नाव दिले. ज्याचे नेतृत्व स्वत: त्याने केले होते. तसेच सेंट्रल टेक्सासमध्ये काढलेल्या मास्क विरोधी रॅलीसाठी लोकांना उत्तेजन आणि पुढाकारही घेतला होता.
American citizen who staged anti-mask rally Died Due to Corona ; The rally was held in Texas
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील सीबीआयच्या ताब्यात!!
- राज्यात एमबीबीएस, एमडीच्या जागा वाढणार, सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार
- मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरूवारी घेणार राष्ट्रपतींची भेट
- ग्लोबल जिहाद – इस्लामच्या शत्रुंपासून काश्मीर सोडवा