आयुष्यात अनेकदा असं होतं जेव्हा आपण कुठलाही विचार विनिमय न करता कुठला तरी निर्णय घेतो. आणि मग आपल्याच चुकीच्या निर्णयावर आपण आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. त्यामुळे कधीही कुठलाही महत्वाचा निर्णय हा घाईघाईने घेऊ नये. जरा संयम बाळगणे गरजेचे असते. त्या क्षेत्रात ज्याला जाण आहे अशा व्यक्तीशी चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा आपल्याला दुसऱ्याचे ऐकून घेण्यातच रस नसतो. त्यामुळे आपण आपले निर्णय धाडकन घेतो व त्याची किंमत चुकवण्याची वेळ मग येते.Always listen carefully to avoid mistakes in everyday life
त्यापेक्षा समजा समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकले तर आपल्याला चुका कशा टाळाता येतील याचा विचार करता येतो. समोरच्याचे अनुभव आपल्या कामी येतात. त्यामुळे त्याने केलेल्या चुका करण्यापासून आपण वाचू शकतो, हे केवळ ऐकण्यामुळे साध्य होते हे लक्षात घ्या. भले तुम्ही समोरच्याचे ऐकून निर्णय घेवू नका. पण किमान तो काय म्हणतोय हे तरी ऐका. त्याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. आपल्या आसपास अनेक असे लोक असतात ज्यांना निव्वळ बडबड करता येते,
म्हणजे ते कधीही कोणाचं ऐकून न घेता स्वतःच बोलत बसतात. अशी अनेक लोक आपण बघत असतो. पण कधीही बोलायच्या आधी समोरची व्यक्ती काही बोलू इच्छिते का हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. म्हणजे विनाकारण बोलण्याआधी समोरच्याचं ऐकून घ्यावं. ह्याने तुमच्या ज्ञानात तर भर पडते, तसेच लोक तुमच्यापासून दूर न जाता जवळ येतात. तुम्हाला इतरांबद्दल जाणून देखील घेता येते.
त्याशिवाय समोरच्याचे ऐकल्याने आपल्यालाही वेगळी व कामाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही जर तुमच्याकडे असलेल्या जुन्या व अपुऱ्या माहितीवरच निर्णय घेत राहिल्यास त्याचा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेहमी इतरांचे मत विचारात घेण्यास, ऐकून घेण्यास विसरू नका.