• Download App
    संकटासाठी नेहमीच तयार रहा, त्याला शत्रू समजा|Always be ready for crisis, consider him an enemy

    लाईफ स्किल्स : संकटासाठी नेहमीच तयार रहा, त्याला शत्रू समजा

    संकटे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येत असतात. संकटातील वाईट वेळ व्यक्तीला नवीन काही शिकवून जात असते. आर्य चाणक्यांच्या मते, संकटाच्या वेळी व्यक्तीला आपल्या जवळील व्यक्ती कोण आहेत आणि कोण आहेत परके याची कल्पना होत असते. आपल्यावर संकट आल्यानंतर सर्वात प्रथम स्वार्थी लोक आपली साथ सोडून जात असतात. आपल्या संकटात जे व्यक्ती आपल्याला मदत करतात,Always be ready for crisis, consider him an enemy

    आपल्या सोबत राहतात. नेहमी मदतीसाठी तयार असतात त्या लोकांची साथ आपण कधीही सोडू नये आणि त्यांचे आभार व्यक्त करावा. चाणक्यांच्या मते, या भूतलावर असं कोणीच नाही की, त्याच्या आय़ुष्यात संकटे आली नाहीत किंवा चढ- उतार आले नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सूख- दु:ख येत असतात. ज्या प्रकारे रात्रीनंतर दिवस येतो त्याचप्रमाणे दुखानंतर सूख येत असते.

    चाणक्यांच्या मते, संकटासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. संकटे आणि अडचणी कधीच सांगून येत नाहीत. जर तुम्ही या संकटाला सामोरे जाण्यास तयार असाल. मानसीक आणि शारिरिक रुपाने तयार असलो तर आपण या संकटांना सहज मात देऊ शकतो. संकटाच्यावेळी काही गोष्टींची दक्षता घेण्या आवश्यक असते. जे लोक चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवतात ते लोक संकटांचा सामना सहजपणे करू शकतात. चाणक्यांच्या मते, संकटाला एखाद्या शत्रूप्रमाणे समजावे. ज्याप्रकारे शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्या प्रयत्न आपण करत असतो.

    त्याचप्रमाणे संकटापासून वाचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. संकटाला कधीही सोपं समजून नये. संकटाकडे एखाद्या आव्हान म्हणून पाहिले पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते, संकटाच्यावेळी धनाचा खरा उपयोग समजतो. यामुळे धनाची पैशाची बचत केली पाहिजे. धनाची बचत आपल्याला संकटापासून वाचवत असते. व्यक्तीच्या जवळ पैसे असले तर संकटातून बाहेर पडण्यास मदत होत असते. यामुळे विनाकारण पैसा खर्च करू नये.

    Always be ready for crisis, consider him an enemy

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!