• Download App
    अक्षयच्या 'बेल बॉटम'मुळे अरब देशांचा जळफळाट; सौदी अरब, कतार आणि कुवैतमध्ये चित्रपटावर बंदी । Akshay Kumar starrer Bellbottom banned in Saudi Arabia, Qatar and Kuwait know the shocking reason

    अक्षयच्या ‘बेल बॉटम’मुळे अरब देशांचा जळफळाट; सौदी अरब, कतार आणि कुवैतमध्ये चित्रपटावर बंदी

    Bellbottom banned in Saudi Arabia : बॉलीवूड अभिनेता अक्षर कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘बेलबॉटम’ केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये रिलीज करण्यात आला आहे, परंतु अक्षयच्या चित्रपटावर सौदी अरेबिया, कुवैत आणि कतारमध्ये बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आहे. Akshay Kumar starrer Bellbottom banned in Saudi Arabia, Qatar and Kuwait know the shocking reason


    वृत्तसंस्था

    मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षर कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘बेलबॉटम’ केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये रिलीज करण्यात आला आहे, परंतु अक्षयच्या चित्रपटावर सौदी अरेबिया, कुवैत आणि कतारमध्ये बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आहे. याचे कारण म्हणजे चित्रपटातील एक सीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथल्या सेन्सॉर बोर्डाच्या मते तो सीन योग्य नाही.

    सत्य दाखवल्याने जळफळाट

    बॉलीवूड हंगामाच्या मते, चित्रपटाच्या उत्तरार्धात अपहरणकर्त्यांनी लाहोरहून दुबईला विमान नेल्याचे दाखवण्यात आले आहे. वास्तविक, अशीच एक घटना 1984 मध्ये घडली होती. यूएईचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी वैयक्तिकरीत्या परिस्थिती हाताळली आणि अपहरणकर्त्यांना यूएईच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते.

    दुसरीकडे बेलबॉटमने अनेक भारतीय अधिकाऱ्यांना यातील मुख्य पात्र म्हणून दाखवले, ज्यात अक्षय कुमारने साकारलेल्या पात्राचा समावेश आहे. अक्षयचे पात्र यूएईच्या संरक्षणमंत्र्यांना त्यांच्या ऑपरेशनबद्दल अंधारात ठेवते. कदाचित म्हणूनच सौदी देशांच्या सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला असावा आणि म्हणून त्यावर बंदी घातली आहे.

    ‘बेलबॉटम’ प्रेक्षकांना आवडला

    कोरोना महामारीच्या दरम्यान हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. बेल बॉटमसाठी अक्षय कुमारचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. निर्मात्यांच्या या निर्णयाचे अनेक बॉलिवूड सेलेब्सनी कौतुक केले आहे.

    Akshay Kumar starrer Bellbottom banned in Saudi Arabia, Qatar and Kuwait know the shocking reason

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक