‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.Akshay Kumar praises ‘Pushpa’; Allu Arjun reacted to this
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आजकाल सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा द राइज’ चित्रपट संपूर्ण भारतात चर्चेत आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट अनेक चित्रपटांना मागे टाकत रोज नवनवे विक्रम करत आहे. ‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे.
हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.अल्लू अर्जुनने या चित्रपटात साकारलेल्या व् सगळीकडे कौतुक होत आहे. आता या स्तुतीत नव्या नावाची भर पडली आहे.बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्लू अर्जुनची प्रशंसा केली आहे.
अक्षय कुमारने ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘ज्या प्रकारे तुझा चित्रपट पुष्पा द राइजला संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी अभिनंदन. यशस्वी चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचे नाव अॅड झाले आहे’ या आशयाचे ट्वीट अक्षय कुमारने केले आहे.
अक्षयचे हे ट्वीट पाहून अल्लू अर्जुनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनापासून आभार.. प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये पाहून आनंद होत आहे’ असे अल्लू अर्जुन म्हणाला आहे.
Akshay Kumar praises ‘Pushpa’; Allu Arjun reacted to this
महत्त्वाच्या बातम्या
- बंगळुरूमध्ये फेब्रुवारीत आयपीएलचा मेगा लिलाव; पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु
- मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी आरक्षणासाठी विधान भवनावर धडक मोर्चा, प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- मोदींच्या दुबार काशी दौऱ्याचा राजकीय मुहूर्त साधत अयोध्येतील जमीन खरेदीवरून प्रियांका गांधींचा निशाणा!!
- आदित्य ठाकरेंना धमकी आली, सरकारने एसआयटीची घोषणा केली!!; विरोधकांनी दारुच्या बाटल्यांची चौकशी “काढली”!!