उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उत्साह आहे. “भाजपमध्ये गळती, समाजवादीत भरती”, अशी सध्या उत्तर प्रदेशातली राजकीय अवस्था असल्यामुळे अखिलेश यादव यांच्या गोटात आनंद पसरला आहे. Akhilesh Yadav’s political shrewdness; Modi on Twitter handle – a reflection of Mamata’s popular slogans !!
भाजपमधून बाहेर पडलेले मंत्री आमदार अन्य कोणत्याही पक्षांची वाट न धरता समाजवादी पक्षात येत आहेत आणि अखिलेश यादव समाजवादी पक्षाच्या कार्यालयात त्यांच्या विशिष्ट हॉलमधे या नेत्यांबरोबरचे फोटो काढून शेअर करत आहेत. पण त्यामध्ये देखील अखिलेश यादव यांची राजकीय चलाखी दिसून येत आहे. किंबहुना अखिलेश यादव यांच्या सध्याच्या राजकीय मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचाराच्या कॅम्पेनमध्ये पूर्वी वापरलेल्या घोषणांचे प्रतिबिंब दिसून येत आहे…!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास” अशा स्वरूपाची घोषणा 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत दिली होती, तर 2019 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी “खेला होबे” ही घोषणा दिली होती. मोदी आणि ममता यांच्या घोषणा राजकीयदृष्ट्या क्लिक झाल्या. याच घोषणांचे प्रतिबिंब अखिलेश यांच्या ट्विटर हँडलवर पडलेले आपल्याला दिसते. भाजपमधून समाजवादी पक्षात आलेल्या मंत्री आणि आमदार यांचे स्वागत करताना अखिलेश यादव मुद्दामून #मेला होबे हा हॅशटॅग वापरून त्यांचे फोटो शेअर करत आहेत. भाजपमधून आलेले आमदार डॉ. धर्मेंद्र सिंह सैनी, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचे आपल्याबरोबरचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करताना अखिलेश यादव यांनी #मेला होबे हा हॅशटॅग आवर्जून वापरला आहे. तर समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते उदय प्रताप सिंह यांच्या “हिंदुस्थान सबका है” या पुस्तकाचे प्रकाशन करताना #”हर रंग हर रस का है हिंदुस्तान सबका है” हा हॅशटॅग अखिलेश यादव यांनी वापरून तो फोटो शेअर केला आहे. यातला “हिंदुस्थान सबका है” ही घोषणाच मुळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “सबका साथ सबका विकास” या घोषणेचे प्रतिबिंब असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बेरजेचे राजकारण
अखिलेश यादव उत्तर प्रदेशात सध्या स्थानिक पातळीवरील छोट्या पक्षांची युती – आघाडी करून समाजवादी महागठबंधन बनवत आहेत. त्याला अद्याप त्यांनी समाजवादी महागठबंधन हे नाव दिलेले नाही पण राजकीय दृष्ट्या बेरजेचे राजकारण करून ते भाजप वर मात करण्याचा मनसुबा राखून आहेत. यात त्यांना यश किती येते हा भाग अलहिदा, पण अखिलेश यादव यांनी राजकीय चातुर्य दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी लोकप्रिय केलेल्या घोषणांचा वेगळ्या पद्धतीचा मिलाफ साधून आपल्या प्रचाराची निदान आपल्या ट्विटर हँडल वरून तरी सुरुवात केली आहे. या राजकीय चातुर्याच्या मिलाफाचे परिणाम काय दिसतात?, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Akhilesh Yadav’s political shrewdness; Modi on Twitter handle – a reflection of Mamata’s popular slogans !!
महत्त्वाच्या बातम्या
- दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटला, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला
- PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश
- PUNE : शिवणेत एका इमारतीच्या पार्किंगमधील आगीत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक
- राज्यातील संसर्ग दर चिंताजनक : राजेश टोपे; भीती बाळगू नका, काळजी घेण्याचे आवाहन
- भायखळ्यात गोडाऊनला लागली भीषण आग , तब्बल ४ तास आग विझवण्यासाठी झुंज