• Download App
    Akash Prime Missile:अचूक मारक क्षमता-रडार-ट्रॅकिंग डिवाइस...अत्याधुनिक शक्तिशाली आकाश प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;ठरणार शत्रूचा काळ... Akash Prime Missile:DRDO Test Akash Missile New Version Akash Prime:

    Akash Prime Missile : अचूक मारक क्षमता-रडार-ट्रॅकिंग डिवाइस…अत्याधुनिक शक्तिशाली आकाश प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;ठरणार शत्रूचा काळ…

    • संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने गाठला आणखी एक मोठा पल्ला
    • अत्याधुनिक शक्तिशाली आकाश प्राइम क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी
    • आकाश प्राइममध्ये शत्रूला अचूक लक्ष्य करण्याची क्षमता
    • विद्यमान आकाश प्रणालीपेक्षा आकाश प्राइम अधिक शक्तीशाली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताने सोमवारी रात्री चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (ITR) नवीन अपडेटेड आकाश क्षेपणास्त्राची (आकाश-प्राईम) यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) उच्च स्पीड मानव रहित हवाई लक्षाला लक्ष्य करून ही चाचणी घेतली जी क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या पूर्ण केली. ओरिसाच्या चांदीपूर येथून सायंकाळी साडेचार वाजता क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.Akash Prime Missile:DRDO Test Akash Missile New Version Akash Prime

    याबाबतची माहिती डीआरडीओने दिली आहे. आकाश प्राईमच्या चाचणीचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

    https://twitter.com/ANI/status/1442493552429125639?s=20

    भारतीय हवाई सेनेकडून या मिसाईलाचा वापर हवाई हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी केला जाईल. डीआरडीओने हे मिसाईल तयार केले आहे. ५६० सेंटीमीटर एवढी या मिसाईलची लांबी असून रुंदी ३५ सेमी आहे. तसेच या मिसाईलमध्ये ६० किलो वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. आकाश मिसाईल पूर्णपणे हाताळण्यायोग्य असून वाहनांच्या चालत्या ताफ्याचे संरक्षण करण्यास देखील सक्षम आहे.

     

    यानिमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांचे अभिनंदन केले आहे. आकाश प्राईममुळे देशातील सुरक्षा आणखी वाढेल असे राजनाथ सिंह म्हणाले.

    Akash Prime Missile:DRDO Test Akash Missile New Version Akash Prime

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती