लावणी गायिका सुरेख पुणेकरांना आमदार करण्यासाठी अजित पवार घेणार अशोक चव्हाण यांच्याशी पंगा घेण्याच्या तयारीत आहेत. बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघवर डोळा ठेवून पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. Ajit Pawar to take on Ashok Chavan to make Lavani singer Surekha Punekar MLA!
विशेष प्रतिनिधी
पुणे : लावणी गायिका सुरेख पुणेकरांना आमदार करण्यासाठी अजित पवार घेणार अशोक चव्हाण यांच्याशी पंगा घेण्याच्या तयारीत आहेत. बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघवर डोळा ठेवून पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुकीचे वेध लागले आहेत. काँग्रेसकडून दिवंगत आमदार अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र पंढरपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाचा झटका लक्षात घेऊन या निवडणुकीसाठी इतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
देगलूर- बिलोली मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.त्यामुळे सुरेख पुणेकर यांचीही येथून लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्यासोबतच इतर 16 कलाकारही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेखा पुणेकर यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले होते. एका मेळाव्यात त्या शिवसंग्रामच्या व्यासपीठावरही बसल्या होत्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
पुणेकर म्हणाल्या “चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 16 सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. मी आतापर्यंत कलेची सेवा केली. आता मला राजकारणातून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायेच आहेत. त्यामुळे 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला प्रवेश घ्यायचा आह
मात्र बिलोली विधानसभेची जागा ही काँग्रेसची आहे. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार का? आणि राष्ट्रवादीला ही जागा लढवण्याचा निर्णय झाल्यास पुणेकरांना तिकीट मिळणार का? असा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी पंगा घ्यावा लागणार आहे.
याआधीही सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना पक्षाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनीच व्यक्त केली होती.
Ajit Pawar to take on Ashok Chavan to make Lavani singer Surekha Punekar MLA!
महत्त्वाच्या बातम्या
- अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल
- निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!