याद राखा, योगी कायम मुख्यमंत्री राहणार मग… AIMIM MP Owaisi publicly threatens police
वृत्तसंस्था
सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे. ओमायक्रॉन संसर्गामुळे या निवडणुका होतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पण कोणताही पक्ष प्रचारात कमी पडताना दिसत नाहीये.
एआयएमआयएमचे अध्यक्ष खा. ओवैसी हेही यूपी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच चर्चेत आला आहे. ओवैसी आपल्या भाषणात पोलिसांकडून मुस्लिमांवर झालेल्यावर अन्यायावर बोलत असताना धमकी देताना दिसत आहेत.
एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यूपीत एका सभेत बोलताना म्हणाले की, मला पोलिसांना सांगायचं आहे की, याद राखा, नेहमी योगी मुख्यमंत्री राहणार नाही. नेहमी मोदीच पंतप्रधान राहणार नाही. आम्ही मुसलमान तुमचा जुलूम विसरणार नाही. अल्लाह आपल्या ताकदीने तुमचा अभिमान चिरडून टाकेल. परिस्थिती बदलेल तेव्हा कोण वाचवायला येईल तुम्हाला. जेव्हा योगी मठात जातील, मोदी डोंगरात जातील, तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला येईल.”
असदुद्दीन ओवैसी यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पोलीस यंत्रणेला अशी जाहीर धमकी देण्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका सुरू असून विरोधकांकडून कारवाईची मागणीही केली जात आहे.
AIMIM MP Owaisi publicly threatens police