• Download App
    मलेशियन अभिनेत्रीवर बलात्कार ,फसवणूक; अण्णा द्रमुकच्या माजी मंत्र्याला अटक AIADMKs ex-minister accused of rape by Malaysian national Is arrested

    मलेशियन अभिनेत्रीवर बलात्कार ,फसवणूक; अण्णा द्रमुकच्या माजी मंत्र्याला अटक

    वृत्तसंस्था

    चेन्नई : मलेशिया अभिनेत्रीला धमकावणे, बलात्कार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी अण्णा द्रमुकचा माजी मंत्री एम. मणीकंदन याला पोलिसांनी अटक केली आहे. AIADMK’s ex-minister accused of rape by Malaysian national Is arrested

    एम. मणीकंदन याला चेन्नई येथील पोलिसांनी बंगळूरमध्ये अटक केली आहे. या प्रकरणी तो पोलिसांना तो कित्येक दिवसांपासून हवा होता. आरोप होताच त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. या प्रकरणी त्याने अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण गुन्हा गंभीर असल्यामुळे तो फेटाळला होता. त्यानंतर तो राज्यातून पळून गेला होता. अखेर बंगळूरमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली.

    मणीकंदन याने एका मलेशियन अभिनेत्रीला लग्नाचे निमित्ताने आपल्या जाळ्यात ओढले होते. सुमारे पाच वर्षे ते एकत्र राहत होते. या काळात त्याने तिची फसवणूक केली, बलात्कार केला तसेच तीन वेळा गर्भपात घडवून आणला. पत्नीला घटस्फोट देतो, मग तुझ्याशी लग्न करतो,असे तो सांगत होता, अशी तक्रार अभिनेत्रीने दिली होती.

    AIADMK’s ex-minister accused of rape by Malaysian national Is arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…