प्रेमविवाहनंतर पत्नीने पाच महिन्यात आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.मात्र, तिचा विरह सहन न झाल्याने पतीनेही तीन दिवसातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्नही केले. मात्र, लग्नानंतर पाच महिन्यात तिने आत्महत्या केली. हा धक्का आणि पत्नीचा विरह सहन न झाल्याने त्यानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरीचिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. After love marriage five months wife succide and after her succide husband also succide in pimpari
अक्षय अंबिलवादे (वय २५, रा गणेश नगर, चिंचवड), अश्विनी जगताप अंबिलवादे असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि अश्विनी दोघे चिंचवड येथील एका शाळेत १० वी पर्यंत शिक्षण घेतले. या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरच्यांना त्यांच्या प्रेमसबंधाबाबत सांगत लग्न करण्याची परवानगी मागितली. घरच्यांनीही त्यांना संमंती देत त्यांच्या २१ नोव्हेंबर २०२१ ला लग्न लाऊन दिले.
पाच महिने त्यांचा संसार सुखी चालला मात्र, १० एप्रिल रोजी अश्विनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या अशा अचानक जाण्याने अक्षय पूर्ण खचला होता. दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी शपथ घेतली होती. मात्र, अश्विनीने मध्येच साथ सासेडल्याने अक्षय पूर्ण खचला. दरम्यान त्याच्या मित्रांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तो असा काही टोकाचे पाऊल उललेल असे त्यांना वाटत होते. लग्नानंतर अक्षय त्याच्या वडिलांसोबत राहत होता. १३ एप्रिल रोजी त्यानेही घरात छताला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.
After love marriage five months wife succide and after her succide husband also succide in pimpari
महत्त्वाच्या बातम्या
- लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका
- राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप
- निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार
- माझ्या भीमा, तू उद्धरली माझ्यासारखीच कोट्यवधी कुळे…