अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येणार असल्याने विरोधकांना ते सहन होत नाहीए. म्हणूनच ते कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना भडकवून आंदोलन करत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येणार असल्याने विरोधकांना ते सहन होत नाहीए. म्हणूनच ते कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना भडकवून आंदोलन करत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
adityanath yogi farmer protest news
कृषि कायद्याचे फायदे आणि शेतकऱ्यांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचण्यासाठी भाजप ठिकठिकाणी शेतकरी मेळावे आयोजित करत आहे. योगी आदित्यनाथ बरेलीत आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हायला हवे की नको, तुम्ही सांगा? मोदींनी हे योग्य काम केलं आहे की नाही? तुम्ही पाठिंबा देताय का? मग बोल…. जय श्री राम असे योगी आदित्यनाथ म्हणाले आणि एकच जयघोष झाला.
योगी म्हणाले की, काश्मिरमधील कलम ३७० रद्द केल्याने विरोधक नाराज आहेत. यामुळे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना चिथावत आहेत. कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरमधील फुटीरतावाद संपेल आणि तिथे तुम्हाला जमीनही खरेदी करता येईल. पंतप्रधान मोदींनी तुम्हाला जो अधिकार दिला आहे ते चांगलं काम आहे ना? पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणार ना? मग बोला भारत माता की जय’,असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
adityanath yogi farmer protest news
योगी आदित्यनाथ म्हणाले की, नवीन कृषी कायद्यांमुळे खासगी क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर मिळेल. शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय बाहेरही विकू शकेल.