उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई मेट्रो कांजूर शेड जमीन आदेश मागे घेण्यास / पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. ठाकरे सरकारच्या राजहट्ट आणि बालहट्टासाठी पाच वर्षे व पाच हजार कोटी रुपये मोजावे लागणार, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई मेट्रो कांजूर शेड जमीन आदेश मागे घेण्यास / पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. ठाकरे सरकारच्या राजहट्ट बालहट्टासाठी पाच वर्षे व पाच हजार कोटी रुपये मोजावे लागणार, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. aditya thackeray latest news
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार का? की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली. aditya thackeray latest news
भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील या मुद्यावरून ठाकरे सरकावर टीका केली. अहंकारी राजाच्या कांजूरमार्गला मेट्रो कारशेड उभारण्याच्या डीजे वाजवण्याला उच्च न्यायालयाने चांगलींच तंबी दिली. कोट्यावधीचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? गेले वर्षभर मुंबईकरांच्या मेट्रोचा हा खेळ खंडोबा करुन डीजे डान्स करणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची आता माफी मागावी! असं शेलार यांनी म्हटलं आहे.
aditya thackeray latest news
न्यायालयाने स्पष्ट शब्दात कांजूरमार्गच्या निर्णयाबाबत सरकारला फटकारले आहे. पुन्हा सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत, असे सांगत आरे कारशेड का नको? असा सवाल ही केलाय. शास्त्रीय गायनाच्या रंगलेल्या मैफलीत वर्षभर स्थगितीचे नकारात्मक डीजे कोण वाजवतेय हे उघड झालेच ना? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे