Monday, 12 May 2025
  • Download App
    यशाच्या मार्गावर सहप्रवासी जोडा |Add fellow travelers on the road to success

    लाईफ स्किल्स : यशाच्या मार्गावर सहप्रवासी जोडा

    कोणतीही गोष्ट करायची असा एकदा निर्णय घेतला की तातडीने कामाला लागा. प्रत्यक्ष कृती करा व निडरपणे कामाला लागा. यशस्वी व्यक्ती जोखीम घेण्यास कधीच घाबरत नाहीत, परिणामी ते सतत नवनवीन आव्हानांना स्वीकारत असतात. त्यानुसार ते योग्य नियोजनही करत असतात. इतिहास साक्षी आहे. आपल्या कल्पनांना कृतीत आणण्यासाठी जोखीम घेऊन जे लोक कामाला लागले, तेच यशस्वी झाले.Add fellow travelers on the road to success

    त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची बाब लक्षात घ्या ती म्हणजे जे लोक तुमच्या सोबत येतील त्यांना घ्या, बाकीच्यांना सोडून द्या. यशस्वी होण्यासाठी आपल्या भोवती यशस्वी व चांगल्या लोकांचे नेटवर्क असावे. यशस्वी लोकांव्यतिरिक्त ज्यांना यशाची भूक आहे व जे यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत अशाचे नेटवर्क विकसित करणे आवश्यक आहे, कारण हेच लोक तुमच्या ध्येयपूर्तीच्या मार्गावर तुमची साथ देतील व कायम तुमचा आत्मविश्वास वाढवत राहतील.

    ज्यांच्या तुमच्यावर व तुमच्या ध्येयावर विश्वास आहे, अशानांच सोबत घ्या व बाकीच्यांना सोडून द्या. जे लोक तुमच्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असे लोक ओळखायला शिका. त्यांच्यासमवेत वेळ व्यतीत करा. त्याचबरोबर वाचन हा यशस्वी लोकांमध्ये दिसणारा ठळक गुण आहे. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनते. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबली नाही पाहिजे, त्याचा उपयोग कायम प्रत्यक्ष जीवनात होतो.

    वाचनामुळे ज्ञानात भर पडते, इतरांचे ऐकण्याची सवयी लागते. त्यामुळे कामाची गती वाढते, वाचनाची आवड असेल, तर एखाद्या विषयावरील चर्चेत आपण ठळकपणे मुद्दे मांडू शकतो. पैसा, गुंतवणूक, अर्थसहाय्य, कर्ज, सबसिडी, कर, शेअर्स, खेळते भांडवल, अकाउंटिंग, फायनान्स इत्यादी सर्वांबद्दल चांगली माहिती यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अर्थसाक्षरता मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. त्यासाठी सतत नवनवे शिकत रहा.

    Add fellow travelers on the road to success

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!