विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीने नुकतंच विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. Actress Prajakta Mali on RSS platform
याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आता तिने या कार्यक्रमाला जाण्याचे कारण सांगितले आहे.प्राजक्ता पोस्टमध्ये म्हणते
“खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला.
“काहीही मदत लागली तर सांगा, we are here to help you, We adore your work”.. इति – देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो. त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.
Actress Prajakta Mali on RSS platform
महत्वाच्या बातम्या
- मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार; मध्य प्रदेशात लोकांना सीएम शिवराज यांची अडचण!
- ड्रग्स माफिया ललित पाटील ठाकरेंचा शिवसैनिक; तर सलमान फाळके, शानू पठाणचे सुप्रिया सुळे, आव्हाडांबरोबर फोटो!!
- ”इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी १८ उमेदवार इच्छुक, प्रत्येक पक्षाला हवंय आपल्या नेत्यासाठी पंतप्रधानपद”