विशेष प्रतिनिधी
चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेता रजनीकांत यांना रात्री उशिरा चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले . अन्नाथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. Actor Rajinikanth has been admitted to Kauvery Hospital in Chennai, says the hospital.
रजनीकांत यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. रजनीकांत हे सध्या ७० वर्षांचे असून त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
रजनीकांत यांना २५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट, समाजकारण, अर्थकारण आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
Actor Rajinikanth has been admitted to Kauvery Hospital in Chennai, says the hospital.