वृत्तसंस्था
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ मध्ये त्यांनी ‘सुमंत’ची भूमिका केली होती. या मालिकेत ते सर्वात ज्येष्ठ कलाकार होते. Actor Chandrasekhar Vaidya passes away
ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील अंधेरीच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शेवटच्या क्षणी कुटुंबांसोबत राहायचं होत आणि त्यांची ही इच्छा पूर्णदेखील झाली.
५० च्या दशकामध्ये सहायक कलाकार म्हणून करिअरची सुरुवात त्यांनी केली. अनेक चित्रपटांत मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. 1953 मध्ये व्ही.शांताराम यांच्या ‘सुरंग’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर कवी, मस्ताना, काली टोपी, लाल रुमाल, स्ट्रीट सिंगरसारख्या चित्रपटात ते मुख्य अभिनेता म्हणून झळकले होते.
शराबी, शक्ती, डिस्को डान्सर, नमक हलाल सारख्या चित्रपटांत सहायक अभिनेता म्हणून काम केलं आहे. ‘रामायण’ मालिकेत त्यांनी ‘सुमंत’ची भूमिका केली.
नातू विशाल शेखरने म्हटलं की, ‘त्यांना अनेक दिवसांपासून ताप येत होता. त्यांना जुहूच्या क्रिटी केयर रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र ताप कमी आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना ही वेळ आपल्या कुटुंबांसोबत घालवायची होती. त्यामुळे घरीच त्यांच्यासाठी सर्व नर्सिंग व्यवस्था केली होती. मात्र आज झोपेतच आजोबा आम्हाला सोडून गेले. ते 98 वर्षांचे होते’.
Actor Chandrasekhar Vaidya passes away
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात बसपचे ११ आमदार फुटताच मायावतींना जाग;मुलायम सिंगांच्या समाजवादी पक्षावर टीकेची झोड
- Tokyo Olympics 2021 : साताऱ्याचा सुपुत्र प्रवीण जाधवची निवड ; भारतासाठी ‘आर्चरी’द्वारे घेणार पदकाचा वेध
- कोल्हापूरात सर्वपक्षीय मराठा आंदोलन सुरू; एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे खासदार संभाजीराजे – चंद्रकांतदादा कोल्हापूरात आंदोलनात एकत्र
- कोरोनामुक्त व्यक्तीला हिरव्या बुरशीचा संसर्ग, देशातील पहिलंच प्रकरण; मुंबईत उपचार सुरु
- पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये मुलाचा तर सासवडमध्ये आईचा मृतदेह आढळला