राष्ट्र सर्वोत्तपरी या विचारधारेवर चालणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन पटेल यांनी व्यक्त केला. Abvp will expand globally appointed national president Dr. Chhagan Patel’s mind
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्र सर्वोतोपरी या विचारधारेवर चालणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन पटेल यांनी व्यक्त केले. Abvp will expand globally appointed national president Dr. Chhagan Patel’s mind
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 66 वे राष्ट्रीय अधिवेशनाला नागपूरच्या रेशमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर येथे प्रारंभ झाला. निवडणूक अधिकारी व राष्ट्रीय सहविद्यार्थी प्रमुख उमा श्रीवास्तव यांनी अभाविप कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. छगन पटेल तर राष्ट्रीय महामंत्रीपदी निधी त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली. Abvp will expand globally appointed national president Dr. Chhagan Patel’s mind
डॉ. छगनभाई पटेल म्हणाले की, संघभूमी, दीक्षाभूमी सारख्या पवित्र भूमीतून माझ्या अध्यक्षपदाच्या वाटचालीस प्रारंभ होत आहे, यासारखे दुसरे भाग्य नाही. राष्ट्र कार्य हे माझ्यासाठी ईश्वरीय कार्य आहे. आधीच्या अध्यक्षांनी अभाविपच्या कार्याला जी गती दिली ते काम आणखी पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न करीन.
Abvp will expand globally appointed national president Dr. Chhagan Patel’s mind
राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी म्हणाल्या की, अभाविप हे राष्ट्रभक्तीचे केंद्र बनावे, विद्यार्थ्यांनी समाज व राष्ट्रहिताचा विचार करावा, यासाठी प्रयत्न केले जातील. शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र अभाविपचे काम वाढविण्याचा मानस व्यक्त केला.