- शेकडो रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ व्हायरल ..
विशेष प्रतिनिधी
नाशिक : सध्या महाराष्ट्रात मनोरंजन क्षेत्रात गाजत असलेलं नाव म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील. असा एकही दिवस नाही की गौतमीच्या कार्यक्रमा संदर्भात आणि गौतमी संदर्भात माध्यमांमध्ये बातमी आली नाही. गौतमीच्या कार्यक्रमाला जाता यावं यासाठी लोक खास रजा घेतात. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात सध्या गौतमीचे कार्यक्रम तुफान सुरु आहेत. मात्र गौतमीचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरणही तितकच घट्ट झालंय Absence of audience at the show of famous dancer Gautami Patil
कुठल्या न कुठल्या कारणामुळे गौतमीचा कार्यक्रम कायमचं चर्चेत राहतो.गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी हा तर सगळ्यांसाठी चर्चेचा विषय असतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम असेल तिथे प्रशासनाला कायम तैनात राहावं लागतं.. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रेक्षक तिचा कार्यक्रम बघायला येतात आणि मग कायमच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो .
मात्र नुकताच एक अतिशय सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. नाशिक जिल्ह्यातील ठक्कर डोम इथं गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम होता. नवनिर्माण सेवाभावीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात मात्र वेगळं चित्र बघायला मिळालं. नेहमी गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांनी मात्र गौतमीच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आलं..
कारण गौतमीच्या कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला ३०० रुपयांपासून दोन हजार रुपयापर्यंत तिकीट लावण्यात आलं होतं. इतकं महागडे तिकीट परवडत नसल्याने. तिच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला. रिकाम्या खुर्च्या आणि अत्यंत कमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा शो तिला उरकावा लागला.
Absence of audience at the show of famous dancer Gautami Patil
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू
- सिद्धरामय्या की शिवकुमार??; गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा; मल्लिकार्जुन खर्गे पेचात!!
- अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
- आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25000 रुपये; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय