विशेष प्रतिनिधी
मुंबई:बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा फक्त त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर भाषा, कविता आणि उत्कृष्ट भाषणांसाठी ओळखले जातात. याशिवाय आशुतोष राणा सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात.महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आशुतोष राणा यांनी आपल्या आवाजात शिव तांडव स्तोत्राचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला होता.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रिलीझ झालेल्या या व्हिडिओला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले होते. मात्र फेसबुकला हे रुचले नाही.काही वेळाने फेसबुक कडून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला.Aashutosh Rana: Facebook insults Hindus religious sentiments – Shivtandavam stotram deleted
नुकताच त्यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं फेसबुकवर ‘शिव तांडव’ व्हिडीओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांचीही या व्हिडीओला चांगली पसंती मिळाली होती. पण आता हा व्हिडीओ फेसबुकवरून डिलीट करण्यात आला आहे. यावर आशुतोष राणा यांनी एक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
आशुतोष राणा यांनी १ मार्चला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी ‘शिव तांडव स्तोत्र’चा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते शिव तांडव स्तोत्राचा पाठ करताना दिसले होते. महाशिवरात्रीच्या निमित्तानं शेअर करण्यात आलेला या व्हिडीओला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. काही तासांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र आता हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=5184504878260959&id=100001044953288&scmts=scwsplos
आशुतोष राणा यांनी फेसबुकवर याबाबत स्वत: माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मी थक्क झालो! काल महाशिवरात्रीला मी शेअर केलेली पोस्ट ज्यात तांडव स्तोत्राचा साधा अनुवाद व्हिडिओ होता, तो माझ्या टाइमलाइनमधून गायब आहे. स्वतःहून! असे का घडले असेल, मला कारण समजले नाही? कारण ना तो मी डिलीट केला आहे, ना तो व्हिडिओ कोणाच्या भावना दुखावणारा होता, ना तो फेसबुकच्या नियमांच्या विरुद्ध होता. #Facebook ने ही बाब विचारात घ्यावी.”
.याशिवाय त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिले होते की, “प्रिय आलोक श्रीवास्तव यांनी त्याच लयीत आणि तालात शिव तांडव स्तोत्राचा हिंदीत केलेला सोपा अनुवाद नक्कीच करोडो शिवनुरागींच्या आनंदाचे कारण बनेल. जगात प्रचलित असलेली विकृती नष्ट करून निसर्गाचे रक्षण व संवर्धन करावे, हर हर महादेव ही महादेवाला प्रार्थना आहे.”
ज्येष्ठ पत्रकार आलोक श्रीवास्तव यांनीही फेसबुकच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत ही देवाधिदेव महादेवाची स्तुती असल्याचे म्हटले आहे. फेसबुकला आक्षेप आहे, असे त्यात काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
आशुतोषच्या या पोस्टला डिलीट केल्याने चाहतेही नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवत आहेत.
दरम्यान, आशुतोष राणाच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना, लोकप्रिय ट्विटर वापरकर्ता ‘द स्किन डॉक्टर’ ने फेसबुकवर अप्रत्यक्षपणे इस्लामीकरण केल्याचा आरोप केला आणि म्हटले, “‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ गाऊन व्हिडिओ पोस्ट करा. जे लोक तुम्हाला फॉलोही करत नाहीत, ते फेसबुक न्यूज फीडमधील ‘तुमच्यासाठी सुचवलेले’ श्रेणीमध्ये देखील दिसतील.
एका युजर ने लिहिले भाई मौला मौला गा लाईक्स अन शेअर चा पाऊस पडेल. बॉलिवूड देखील वाह वाह करेल .
कैलाश विजयवर्गीय यांनी देखील यावर आश्चर्य व्यक्त करत फेसबुकला हे थांबविण्यास सांगितले आहे .