• Download App
    Aarayan Khan Exclusive :आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने जामीन फेटाळलं;आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार... Aarayan Khan Exclusive: Aryan Khan's jail term extended; Court rejects bail; now meal in jail; have to get up at six o'clock ...

    Aarayan Khan Exclusive :आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने जामीन फेटाळलं;आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार…

    • कोर्टाने आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांचाही जामीन नाकारला आहे
    • ड्र्ग्ज प्रकरणात आर्यनला न्यायालयीन कोठडी, स्पेशल ट्रिटमेंट नाही; ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांचाही जामीन कोर्टाने फेटाळला आहे. आर्यन खानचं काय होणार हा प्रश्न आज होताच. मात्र आता त्याला जामीन नाकारण्यात आला आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याला जामीन नाकारला आहे त्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.आर्यन खान हा मागील 7 दिवसांपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. Aarayan Khan Exclusive: Aryan Khan’s jail term extended; Court rejects bail; now meal in jail; have to get up at six o’clock …

    ड्रग्ज केस प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आर्यनसह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २ ऑक्टोबरला NCB ने मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर छापेमारी करुन अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी काही जणांना अटक केली होती, ज्यात आर्यन खानचाही समावेश होता.

    आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट मिळणार नसून त्याला इतर कैद्यांप्रमाणेच रहावं लागणार आहे. मुंबई तक कडे आर्यन खानची आर्थर रोडमधली दिनचर्या कशी असेल याची माहिती आली आहे.

    आर्यन खान आणि इतर ५ आरोपींना जेलमध्ये बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात येईल. ही बराक कोरोना काळात क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात येत असून ती जेलमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. सध्याच्या घडीला आर्यन खानला जेलचा युनिफॉर्म मिळणार नाहीये. या बराकमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना ५ दिवस काढावे लागतील. जर त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांची चाचणी केली जाईल. परंतू आर्यन आणि इतर ५ आरोपींची याआधीच कोरोना चाचणी झाली असून तिचा निकाल निगेटीव्ह आला आहे. या सर्व आरोपींनी लसीचे दोन डोस घेतल्यामुळे त्यांना या बराकमध्ये ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल.

    या आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळणार असून, त्यांना फक्त जेलमधलं खाणं मिळणार आहे. बाहेरील खाणं त्यांना मिळणार नाही. NCB कोठडीत असताना आर्यन खान आणि इतर आरोपींसाठी बाहेरच्या खाण्याची सोय करण्यात आली होती.

    Aarayan Khan Exclusive: Aryan Khan’s jail term extended; Court rejects bail; now meal in jail; have to get up at six o’clock …

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य