• Download App
    Aamir Khan Announces Divorce : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी मार्ग झाले वेगळे । Aamir Khan Announces Divorce With Kiran Rao, After 15 Years Of Marriage

    Aamir Khan Announces Divorce : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी मार्ग झाले वेगळे

    Aamir Khan Announces Divorce : लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी संयुक्त निवेदनात जाहीर केले की, आता त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता दोघेही पती-पत्नीऐवजी स्वतंत्रपणे आयुष्य जगतील. ही बातमी दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. Aamir Khan Announces Divorce With Kiran Rao, After 15 Years Of Marriage


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी संयुक्त निवेदनात जाहीर केले की, आता त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता दोघेही पती-पत्नीऐवजी स्वतंत्रपणे आयुष्य जगतील. ही बातमी दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.

    आमिर-किरण यांची विभक्त होण्याची घोषणा

    आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे की, ‘या 15 सुंदर वर्षांमध्ये आम्ही आयुष्यभरातील अनुभव, आनंद एकत्र शेअर केले. आमचे नाते फक्त विश्वास, आदर आणि प्रेमाने वाढले. आता आम्ही आमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू इच्छितो. नवरा-बायको म्हणून नव्हे तर सह-पालक आणि कुटुंब म्हणून. आम्ही काही काळापूर्वी वेगळे होण्याचा प्लॅन सुरू केला होता. आता ही व्यवस्था औपचारिक करणे सहज होत आहे.

    भविष्यातही एकत्र काम करणार

    त्यांनी पुढे असेही लिहिले आहे की, ‘आम्ही दोघेही स्वतंत्रपणे राहूनही एक विस्तारित कुटुंब म्हणून आपले जीवन शेअर करू. आम्ही आमचा मुलगा आझाद याला समर्पित पालक आहोत, त्याला आम्ही एकत्रित वाढवू. आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि ज्या प्रकल्पांसाठी आम्हाला खूप काळजी आहे त्यांना सहकार्य करणे सुरूच ठेवू.

    कुटुंबाचे मानले आभार

    आमच्या नात्याला सतत समर्थन आणि समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटूंबाचे आणि मित्रांचे आभार, त्यांच्याशिवाय आम्हाला हे पाऊल उचलणे शक्य झाले नसते. आम्ही आमच्या हितचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो. अशी आशा आहे की, आमच्याप्रमाणे आपण हा घटस्फोटाला अंतर म्हणून नव्हे, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पाहाल. धन्यवाद आणि प्रेम!
    – किरण आणि आमिर.

    लगानच्या सेटवर झाली होती भेट

    आमिर खान आणि किरण राव ‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर दोघेही प्रेमात पडले. दोघांनी 28 डिसेंबर 2005 रोजी लग्न केले. सरोगसीच्या मदतीने दोघांनी आपला मुलगा आझाद याला जन्म दिला. 15 वर्षांच्या या विवाहात किरण आणि आमिरने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एकत्रितपणे दोघांनी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. किरणच्या आधी आमिर खानने रीना दत्ताशी लग्न केले होते. त्या लग्नापासून आमिरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

    Aamir Khan Announces Divorce With Kiran Rao, After 15 Years Of Marriage

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला