• Download App
    अखेर केरळमध्ये विशेष अधिवेशन उद्या होणार; राज्यपाल व सरकारमधील पेचप्रसंग टळला | The Focus India

    अखेर केरळमध्ये विशेष अधिवेशन उद्या होणार; राज्यपाल व सरकारमधील पेचप्रसंग टळला

    केंद्र सरकारच्या तीन कृषीविषयक कायद्यांविरोधात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, असा तगादा राज्य सरकारने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे लावला होता.

    विशेष प्रतिनिधी

    तिरूअनंतपुराम : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी 31 डिसेंबर रोजी विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यास अखेर मान्यता दिली. a special assembly session will be held in Kerala tomorrow

    केंद्र सरकारच्या तीन कृषीविषयक कायद्यांविरोधात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, असा तगादा राज्य सरकारने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे लावला होता. त्याबाबत दोनदा मंत्रिमंडळाने शिफारस केली होती. पहिली शिफारस राज्यपाल खान यांनी फेटाळली होती. परंतु दुसरी शिफारस स्वीकारली आहे, त्यामुळे विशेष अधिवेशन घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

    a special assembly session will be held in Kerala tomorrow

    खरे तर 8 जानेवारीला विधानसभेचे अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्यास विरोध करून मंत्रिमंडळाची शिफारस फेटाळली होती. परंतु कृषी कायद्यांना विरोधासाठी विरोध करण्यासाठी विशेष अधिवेशनाचा घाट घातला गेला आहे.

    Related posts

    मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये तुटली युती; मतदाना आधी भाजप – शिवसेनेला स्वबळाची खुमखुमी; निकालाच्या नंतर एकमेकांना गळा मिठी!!

    नाशकात भाजपने आमदारांच्या घरातली तिकिटे कापली; पण विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहेरबानी!!

    पवार काका – पुतण्यांची मजबुरीची युती; एकेक प्रभागात चार सक्षम उमेदवार देताना दोन्ही राष्ट्रवादींची दमछाक!!